सेवा सुविधा — गावाच्या प्रगतीसाठी
ग्रामपंचायतीमार्फत जन्म व मृत्यू नोंदणी करून प्रमाणपत्र दिले जाते. आवश्यक कागदपत्रे — अर्ज, ओळखपत्र, नोंदणी क्रमांक (असल्यास).
ग्रामपंचायत कार्यालयात विवाह नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रे — विवाह प्रमाणपत्र, वधू-वरांचे ओळखपत्र, साक्षीदारांची माहिती.
दारिद्र्य रेषेखालील (BPL) नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी हा दाखला दिला जातो.
ग्रामपंचायत कार्यालयात घरपट्टी व पाणीपट्टीचे बिल भरण्याची व पावती घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
जमिनीच्या मालकी हक्कासाठी नमुना ८अ (भूमी अभिलेख) दाखला मिळविण्याची सुविधा.
शासनाच्या निराधार योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेला ‘निराधार असल्याचा दाखला’ ग्रामपंचायतीमार्फत दिला जातो.